झपाटलेला चित्रपट आपल्या सर्वांच्या चांगल्याच परिचयाचा आहे. आपण लहान पणापासून एक दोन वेळा नव्हे तर कित्तेकदा हा चित्रपट पाहिला असेल. ह्या चित्रपटामुळे फक्त लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांनाच नाही तर चित्रपटातील सर्वच कलाकारांना अमाप प्रसिद्धी मिळाली. पण अनेकांना हे माहित नसेल कि हा चित्रपट एका हॉलिवूड चित्रपटाची अगदी हुबेहूब कॉपी आहे. झपाटलेला हा चित्रपट ‘चाइल्डस प्ले’ या चित्रपटाची कॉपी आहे हा चित्रपट १९८८ साली रिलीज झाला होता आणि ह्याचे एकूण ३ पार्ट बनवण्यात आले होते.

झपाटलेला चित्रपटाची ही संकल्पना याच चित्रपटातून घेतली गेल्याचे बोलले जाते. झपाटलेला चित्रपटात सुरूवातीला बाबा चमत्कार तात्या विंचूला अमर होण्याचा मंत्र देतो त्या मंत्राचा वापर करून मरतेवेळी तात्या विंचू त्याचा बाहुल्यावर प्रयोग करतो आणि बाहुल्यात तात्या विंचू याचा आत्मा जातो. अगदी याच प्रमाणे चाइल्डस प्ले या चित्रपट देखील चक्की दाखवला आहे.

अधिक वाचा  भाजपा नगरसेविकेकडून गौतम बुद्धांची विटंबना; समाजाच्या आक्रमकतेनंतर जाहीर माफी

ज्याप्रमाणे महेश कोठारे त्याचा खात्मा करतो त्याच प्रमाणे चाइल्डस प्ले चित्रपटात देखील इन्स्पेक्टर डेंजरस डाकूला संपवतो आणि तो डाकू मंत्रांचा वापर करून त्याचा आत्मा बाहुल्याच्या आत टाकण्यात यशस्वी होतो. महेश कोठारे यांनी चाइल्ड्स प्ले चित्रपटाच्या संकल्पनेवर मराठी चित्रपट बनवण्याचे धाडस केले आणि त्यात ते यशस्वीदेखील ठरले.

भारतात ह्यापूर्वी कधीही अश्या प्रकारचा चित्रपट बनला नव्हता महेश कोठारे यांनी उत्तम स्टारकास्ट निवडून हा चित्रपट बनवला आणि त्याला अमाप प्रसिद्धी देखील मिळाली.