पुणे – अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी (२२ एप्रिल) फेटाळला आहे. ७ ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी महापुरूषांच्या वंशजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर याप्रकरणी अमर पवार यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

त्यामध्ये अ‍ॅड. सदावर्ते यांनी महापुरुषांच्या वंशजांचा एकेरी उल्लेख केला, तसेच विशिष्ट समाजाचा अपमान होईल, जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याने समाजाच्या भावना दुखावल्याचे फिर्यादीत म्हटले होते. दरम्यान, या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी सदावर्ते यांच्यावतीने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी त्यास विरोध केला. त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात यावा, अशी विनंती केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी जामीन फेटाळल्याचा आदेश दिला.

अधिक वाचा  अनुप डांगेंचा आणखी एक लेटर बॉम्ब