पुणे – एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मिटून प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. पुणे विभागात 4 हजार 165 कर्मचारी हजर आहेत. एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या 99 टक्के आहे.उन्हाळी सुट्ट्यांमुळे कर्मचाऱ्यांची हजेरी महामंडळासाठी देखील फायदेशीर ठरणार आहे.

विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्याच्या विविध आगारांमध्ये ऑक्‍टोबर अखेरपासून संप पुकारला होता. तर 8 नोव्हेंबरपासून पुणे विभागातील सर्व 13 आगारांमधील कर्मचारी संपावर गेले होते. पुणे विभागात एकूण 4 हजार 195 कर्मचारी असून, आतापर्यंत 4 हजार 165 कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. तर सध्या विभागात 640 बसेसच्या 2 हजार 100 फेऱ्या होत आहेत. यासह प्रवासी संख्या देखील 80 हजारांवर पोहोचली असून, दैनंदिन उत्पन्न 85 लाख झाले असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.

अधिक वाचा  ब्राह्मण महासंघाने सांगितली पवारांसोबतच्या बैठकीचं आमंत्रण नाकारण्याची कारणं..