सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे गरवंतांच्या मदतीसाठी नेहमी पुढे सरसावत असतात. गरजू लोकांसाठी निढळ हस्ते ते त्यांचा मदतीचा हात पुढे करत असतात. यामध्ये काहीजण निनावी मदत करत असतात. तर काही त्यांच्या निधनानंतरही चांगले कार्य सुरु ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर बॉलिवूडमध्ये असेच काही कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या मरणानंतर त्यांची संपत्ती समाजकार्यासाठी दान केली आहे. कोण आहेत हे कलाकार जाणून घेऊया.

बॉलिवूडमधील हवाहवाई गर्ल म्हणून श्रीदेवी यांची ओळख होती. त्यांच्या अकाली मृत्यूने संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. रिपोर्टनुसार श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या नावाने मोठी रक्कम दान केली होती. बोनी कपूर यांनी एका छोट्याशा गावात मुलांना शिक्षण मोफत मिळावे, यासाठी शाळा बांधली होती. या शाळेसाठी त्यांनी हे पैसे दान केले होते.

अधिक वाचा  मुख्यमंत्र्यांच्या अजब अटी; राजेंनी डोकेच खाजवले! अटी सुधारणेचा प्रस्ताव

इरफान खान –

बॉलिवूडमधील एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून इरफान खान यांची ओळख होती. परंतु, २ एप्रिल २०२० रोजी कॅन्सर या आजाराने त्यांचा जीव घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात आली होती. रिपोर्टनुसार, इरफान यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुतापा सिकद यांनी सांगितलं होतं की, इरफान यांनी त्यांच्या संपत्तीतील सर्वात मोठा वाटा समाजकार्यासाठी वापरायचं ठरवलं होतं. त्यानुसार त्यांनी ६०० कोटी रूपये दान केले होते.

सुशांत सिंह राजपूत –

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. १४ जून २०२० रोजी त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आपल्या अभिनयाशिवाय सुशांत त्याच्या नम्र आणि प्रेमळ स्वभावामुळे ओळखला जात असे. रिपोर्टनुसार, सुशांतला सुरूवातीपासूनच दानधर्म करायची आवड होती. त्यामुळे सुशांतच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याची सर्व संपत्ती दान धर्म करण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचा  ब्राह्मण महासंघाने सांगितली पवारांसोबतच्या बैठकीचं आमंत्रण नाकारण्याची कारणं..

सिद्धार्थ शुक्ला –

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे २ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झाले. अवघ्या वयाच्या ४० व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याने या जगाचा निरोप घेतला. असे सांगितले जाते की, सिद्धार्थ शुक्लाने त्याच्या मृत्यूपूर्वी त्याचं मृत्यूपत्र तयार केलं होतं. सिद्धार्थ ५० कोटींच्या संपत्तीचा मालक होता. तर सिद्धार्थची ही सर्व संपत्ती दान करण्यात यावी, असे त्याने त्याच्या मृत्यूपत्रात नमूद केलं होतं. परंतु, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.

लता मंगेशकर –

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या मृत्यूने एका युगाचा अंत झाला, अशी हळहळ सर्वत्र व्यक्त करण्यात आली होती. मृत्यूसमयी त्या ९२ वर्षांच्या होत्या. तर रिपोर्टनुसार, लता दीदींनी त्यांच्या मरणापूर्वी एक मृत्यूपत्र तयार केलं होतं. या मृत्यूपत्रानुसार त्यांनी त्यांची सर्व संपत्ती दान करण्यास सांगितली होती. रिपोर्टनुसार त्यांच्याकडे एकूण ३६० कोटी रूपयांची मालमत्ता होती.