राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाविषयी केलेल्या विधानाचा सध्या ब्राम्हण महासंघाने तीव्र विरोध दर्शविला आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या नेते देखील नाराज असलेले पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याने पोस्ट टाकत मिटकरींना त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावीच लागेल असे म्हटले आहे.

अमोल मिटकरी यांनी लग्नाचा विधी, कन्यादानाविषयी केलेल्या वक्तव्याने ब्राम्हण समाज संताप व्यक्त करत आहे. विविध मंत्रोच्चार जसे की हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे मंत्र उच्चारून खिल्ली उडवली असा आरोप ब्राम्हण महासंघाने करत काल पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर आंदोलन देखील केले होते.

अधिक वाचा  अजितदादांनी वाढवलं शिवसेनेचं टेन्शन; संभाजीराजे यांनी अपक्ष अर्ज भरल्यास चुरस!

एकीकडे ब्राह्मण महासंघाने या वक्तव्याचा जोरदार विरोध केला, तर दुसरीकडे नाशिकमधूनही एका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याने त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. हा नेता राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे ज्या गावचे आहेत, त्या परळीतील आहे. नेत्याचे नाव बालाजी धर्माधिकारी आहे.

माजी नगराध्यक्ष आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून बालाजी धर्माधिकारी यांची ओळख आहे. त्यांनी फेसबुकवर अमोल मिटकरींची खिल्ली उडवणारी पोस्ट टाकली आहे. हिंदू धर्मात मम भार्या समर्पयामि असा कोणताही मंत्र नसतो. मात्र मिटकरींना आमदारकीसाठी सापडलेलं हे तंत्र असू शकतं.. ही जाहीर खिल्ली आहे, अशी पोस्ट धर्माधिकारी यांनी टाकली आहे.

अधिक वाचा  टेक्सास गोळीबार प्रकरण; प्रियांका चोप्रा शोक व्यक्त करत म्हणाली...

बालाजी धर्माधिकारी म्हणाले की, या विषयात काहीजण धनंजय मुंडेंना विनाकारण ओढत आहेत. माझा त्यांच्या बाबतीतला अनुभव छान आहे. मी 22 वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करतोय. ते ब्राह्मण द्वेष तर नक्कीच करत नाहीत. ते फक्त अमोल मिटकरी यांनी केलेल्या मिमिक्रीवर खळखळून हसले आहेत.

बालाजी धर्माधिकारी यांच्या या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून या वक्तव्याबद्दल माफी मागावीच लागेल, असा सूर त्यातून उमटत आहे. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे हे देखील खळखळून हसले. त्याचं काय कारण असा सवाल प्रतिक्रियांमधून विचारण्यात आला. त्यावर बालाजी धर्माधिकारी यांनी उत्तरही दिले आहे.

अधिक वाचा  लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षाचा शुभारंभ सोहळा,राष्ट्रपतींच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान