कोथरूड भागातील सामाजिक कार्यकर्ते व पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांना पुणे विभागातील विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती (DRUCC) वर सदस्य म्हणून नियुक्त केले आहे.

भारतीय जनता पार्टीमध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन माननीय खासदार श्री प्रकाश जावडेकर यांची शिफारसीनुसार पुणे समितीत 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील मिश्रा वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक मध्य रेल्वे पुणे यांनी डॉ. संदीप बुटाला यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.

अधिक वाचा  अनुप डांगेंचा आणखी एक लेटर बॉम्ब