मुंबई – रखरखता उन्हाळा सुरु असून शरिराची लाही लाही होत असलेली पहायला मिळत आहे. अशातच राज्यात नव्या संकटानं डोकं वर काढलं आहे.राज्यात लोडशेडिंगचं नवं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे लोडशेडिंगबाबत उर्जामंत्री नितीन राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीला वीजनिर्मितीच्या नियोजनाबाबत उर्जा विभागाची बैठक झाली. बैठकीस उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि महावितरणचे मुख्य अधिकारी उपस्थीत होते.लोडशेडिंगसंदर्भात बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री आणि उर्जामंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना आण सल्ला दिला.

देशात विजेची टंचाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोविड संपल्याचा परिणामही विजेची मागणी वाढण्यावर झालेली आहे, असं उर्जामंत्र्यांनी सांगितलं.ही परिस्थिती समजून घेऊन सर्वांनीच वीज बचत करायला हवी. वीजेची उधळपट्टी होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

अधिक वाचा  पुण्यातही मंदिराच्या जागी उभारल्या मशिदी, मनसे नेते अजय शिंदेंचा दावा

महानिर्मितीने राज्यासाठी आवश्यक वीज उपलब्ध व्हावी यासाठी खासगी वीज कंपन्या तसेच अन्य पर्यायी मार्गांबाबतचे काटेकोर नियोजन करावे, असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

वीज गळतीच्या बाबतीत बेजबाबदारपणा चालणार नाही. त्याकडे दुर्लक्ष करू नका. वीजेचे संकट हे केवळ आपल्या राज्यातच नाही तर ते देशभरात आहे.सार्वजनिक ठिकाणच्या वीज वापराबाबत उधळपट्टी होणार नाही, याबाबत जागरूक राहण्याचे निर्देश देण्यात यावेत. यासाठी ग्रामविकास, नगरविकास आणि ऊर्जा विभागाने संयुक्तपणे प्रयत्न करावेत, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.