आद्यक्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र शासनाकडून ८७.११ कोटी रुपयांच्या तरतुदींचा धनादेश उप-मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार व स्मारक समितीचे अध्यक्ष मा. विजय बापू डाकले यांच्या हस्ते मा. आयुक्त पुणे महानगरपालिका श्री. विक्रम कुमार, यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

आज शुक्रवार दि. २२ एप्रिल २०२२ रोजी शासकिय विश्रामगृह येथे आदरणीय अजितदादा पवार यांनी स्मारकाच्या कामकाजासंदर्भात बैठक बोलवली होती. याबैठकीत भूसंपादन, स्मारकाचा नियोजित आराखडा, त्याकरिता निधी यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीला मा. विभागीय आयुक्त श्री. सौरव राव, मा. जिल्हाधिकारी पुणे श्री. डॉ. राजेश देशमुख,मा. आयुक्त पुणे महानगरपालिका श्री. विक्रम कुमार, मा. समाजकल्याण आयुक्त श्री.प्रशांत नारनवरे, तसेच समितीचे अध्यक्ष मा. विजयबापू डाकले, सदस्य मा. बाळासाहेब भांडे, मा. रवी पाटोळे, मा. रामभाऊ कसबे, मा. डॉ. राजू अडागळे, मा. शांतीलाल मिसाळ उपस्थित होते.

अधिक वाचा  आळंदीतील भागीरथी कुंडाचे पावित्र्य जोपासण्यास नागरिकांनी सहकार्य करावे : मुख्याधिकारी जाधव