पुणे : आज आम्ही कार्यालयात घूसलो, मात्र उद्या घरात घुसू असा इशारा ब्राम्हण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी दिला. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका विधानावरुन ब्राम्हण महासंघातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी दवे यांनी आक्रमक भूमिका घेत वरिल वक्तव्य केले.

दवे म्हणाले, शेकडो वर्षांपासून हा मंत्रोपचार केला जात आहे. हा मंत्र चुकीच्या पद्धतीनं बोलला जातोय. हे इतके दिवस तुमच्या पैकी कुणाला सुचले नाही का ? मिटकरी यांनी बोललेला मंत्र नाहीए, तो लग्नात बोलला जात नाही. तुम्हीचा चुकीचा मंत्र सांगत असून तो चुकीच्या पद्धतीनं मांडत आहात. ज्यांनी हे वक्तव्य केले आहे, त्यांनी कधी पौराहित्य केलंय का? हा हिंदु धर्माचा अपमान आहे. केवळ ब्राम्हण समाज पौरोहित्य करत नाही, माळी, लिंगायत इतर समाजही करतात. हिंदू धर्मातिल सर्व समाजाचा हा अपमान आह. हे सहन होण्यापलीकडील आहे. आज आम्ही कार्यालयात घुसलो उद्या घराघरात घुसू हेच सांगायचे असून स्पष्टीकरणं मागणारे तुम्ही कोण? असा सवालही दवे यांनी यावेळी केला.

अधिक वाचा  "सामाजिक कार्य करण्यास पद किंवा सत्तेची गरज नाही."- अण्णा हजारे

पुरंदरे यांचं पत्र व्हायरलं केलं. तरीही तुमचे नेते मुग गिळून गप्प बसले आहेत. शरद पवारांचा बाबासाहेब पुरंदरेंची आरती उतरवण्याचा व्हिडिओ आहे, तो तुम्हाला आम्ही पाठवला आहे. यावर शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्टीकरण द्यावं. एवढी वर्ष सत्तेत येऊ शकत नाही, कारण तुम्ही जातीयवादाचं विष पसरवलंय हे आता थांबावं हीच आमची भूमिका आहे, असंही यावेळी आनंद दवे यांनी म्हटलं आहे.