मुंबई : ‘भोंगा’ चित्रपटाचं प्रदर्शन म्हणजे मनसेचा कमर्शिअल पब्लिसिटी स्टंट आहे. भोंग्याची पार्श्वभूमी मनसेने चांगली तयार केली. सामाजिक मग धार्मिक तेढ याद्वारे भोंग्याला चांगली प्रसिद्धी दिली. कमर्शियल काम कस करता येईल हे मनसेकडून शिकावं असा टोला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला.

3 तारखेला मिटिंग घेणार म्हणे मुंबईचे वातावरण यांनी तापवलं आणि तेवढ्यात हा भोंगा चित्रपट प्रदर्शित करत आहे. भोंग्यांचा कमर्शियल ट्रेंडिंग स्टंट करण्यासाठी हे सगळं मनसेने केलं आहे.  मनसेचा हा सगळा 100 टक्के पब्लिसिटी स्टंट होता. भोंगा 2019 ला प्रदर्शित होणार होता. पण त्यावेळी लाव रे तो व्हिडिओ सुरु झाला होता, असंही पेडणेकर म्हणाल्या.

अधिक वाचा  अंदमानात पावसाचं लवकरच आगमन, 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

भोंगा या चित्रपटाची निर्मिती निर्माते, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अर्जुन हिरामन महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली असून, या आशयघन चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांभाळली आहे. अभिनेत्री दिप्ती धोत्रे आणि अभिनेता कपिल कांबळे, श्रीपाद जोशी,अमोल कागणे, पवन वैद्य, आकाश घरत यांचाही अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.