मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान एक गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनय आणि सौंदर्यासोबतच तिच्यात असलेली नम्रता चाहत्यांना नेहमीच भावते. सारा अली खान ही नेहमीच तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. पापाराझी असो अथवा एखादा फॅन ती नेहमीच सर्वांशी हसून आणि सौजन्याने वागते.मात्र नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात साराच्या रागाचा पारा चढलेला दिसत आहे. साराचा हा अवतार पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की असं काय घडलं की साराला एवढा राग आला.

काय घडलं नेमकं

साराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ती एका प्रोजेक्ट सेटवरून बाहेर पडत गाडीमध्ये बसत होती. सेलिब्रेटींचे फोटो घेण्यासाठी अशा ठिकाणी पापाराझी नेहमीच असतात. सहाजिकच साराचे फोटो घेण्यासाठी पापाराझींनी गोंधळ केला. या गोंधळात साराला एका फोटोग्राफरचा धक्का लागला. ज्यामुळे चीड येत सारा अली खान लगेच तिच्या गाडीत बसली. पण असं झाल्यावरही फोटग्राफर्स तिला फोटो देण्यासाठी विनंती करू लागले. या विनंतीला धुडकावत चिडलेल्या साराने पापाराझींवर तिचा राग ओकला. सारा रागाने म्हणाली, “मी फोटो काढायला दिले तर तुम्ही मलाच धक्का देता” साराचा हा अवतार सर्वांसाठीच नवा होता. कारण या अवतारात नेहमी हात जोडून नम्रतेने आणि सौजन्याने वागणारी सारा कुणाला दिसली नाही. सहाजिकच साराचा हा व्हिडिओ बघता बघता व्हायरल झाला आणि सारा ट्रोल होऊ लागली. काही जणांना साराचे वागणे योग्य आहे असं वाटलं. कारण पापाराझींच्या वागण्याचा अतिरेक झाल्यामुळे सारा चिडणं स्वाभाविक आहे असं त्यांना वाटलं. मात्र काहींनी याचा वेगळाच अर्थ काढायला सुरूवात केली. साराच्या डोक्यात हवा गेली असून ती आता पापाराझींशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे असं अनेकांचं मत आहे.

अधिक वाचा  म्हणून पुण्यातील राज ठाकरेंची नियोजित सभा रद्द

सध्या सारा तिच्या आगामी एका चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.  सारा लक्ष्मण उत्तेकर यांच्या अनटायटल्ड नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे.