मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना एका महिलेने धमकावत 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला असून या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमका प्रकरण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने धनंजय मुंडे यांच्याकडून 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाहीत तर बलात्काराची तक्रार दाखल करेन अशी धमकी या महिलेने दिली आहे. आंतरराष्ट्रीय फोन क्रमांकावरुन धनंजय मुंडे यांना या महिलेने फोन करुन धमकी दिली.

अधिक वाचा  आर्यन खान देश सोडून अमेरिकेत जाऊन राहणार?

वारंवार या महिलेकडून फोन कॉल येऊ लागला , त्यासोबतच या महिलेने मंत्री धनंजय मुंडे यांना धमकावत म्हटलं की, 5 कोटी आणि महागडा मोबाइल दिला नाही तर सोशल मीडियात बदनामी करेन. यानंतर मुंबई पोलिसांत मंत्री धनंजय मुंडे यांनी या महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित महिलेच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात आता मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संबंधित महिला ही धनंजय मुंडे यांच्या परिचयाची असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी हे प्रकरण क्राईम ब्राँचकडे सोपवली असून आता या चौकशीत काय समोर येतं हे पहावं लागेल.

अधिक वाचा  केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती हॉस्पिटल मध्ये दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत संबंधित महिलेने धनंजय मुंडे यांना आंतरराष्ट्रीय फोन क्रमांकावरुन फोन केले होते. यावेळी या महिलेने धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटी रुपये आणि महागडा मोबाइल फोन देण्याची मागणी केली होती.