नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत गुन्हेगार सुसाट झाले आहेत. ज्याचा अंदाज जहांगीरपुरीमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर दिसून आला आहे. कारण गाझीपूर पोलीस स्टेशन परिसरात गोळीबार करण्यात आला आहे. भाजप नेते जितू चौधरी यांची गाझीपूर पोलीस स्टेशन परिसरात गोळ्या झाडून हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. जितू चौधरी यांच्यावर हल्लेखोरांनी 6 गोळ्या झाडल्या आहेत. जितू चौधरी हे भाजपचे मयूर विहार जिल्ह्याचे मंत्री होते.

पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की, जितू चौधरी याचा बांधकाम व्यवसाय होता. त्यांचा एका ठेकेदारासोबत पैशांवरून वाद सुरू होता. हत्येमागे व्यवहाराचा वाद असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी 42 वर्षीय जितू चौधरी यांच्यावर बुधवारी रात्री 8.15 च्या सुमारास अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अधिक वाचा  अनिल परब म्हणाले, रिसॉर्ट माझं नाही; सोमय्यांनी मालमत्ता कर,घरपट्टी भरल्याची पावतीच दाखवली

जितू चौधरी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून जखमी केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर लोकांनी त्यांना खासगी वाहनाने रुग्णालयात नेले. त्याचवेळी रुग्णालयात डॉक्टरांनी जितू चौधरी यांना मृत घोषित केलं. सध्या त्यांच्या गुन्हे पथकाने घटनास्थळाची पाहणी केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. घटनास्थळावरून काही रिकामी काडतुसे आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजचा शोध सुरू आहे.

संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. बुधवारी रात्री 8.15 च्या सुमारास, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझीपूर पोलीस स्टेशनच्या बीट कर्मचाऱ्यांना पेट्रोलिंगदरम्यान मयूर विहार परिसरात गर्दी दिसली. ज्यामध्ये 42 वर्षीय जितेंद्र उर्फ ​​जीतू चौधरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.