पुणे: पुण्यात आजअतिक्रमण कारवाईला परत वेग आल्याचे दिसून आले.डीपी रोडवरील हॉटेल्स, लॉन्सवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज कारवाई केली. महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक मोठ्यासंख्येने कर्मचारी आणि पोलिसांसह हॉटेलवर अतिक्रमण करण्यात आले.

शिवाय, मोठ्याप्रमाणावर बुलडोझर, क्रेनसह अतिक्रमण पाडण्यासाठीची यंत्रणा देखील या ठिकाणी आणली होती.
महापालिकेच्या या कारवाईमुळे डीपी रोडवरील एकाबाजूचा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या रोडवर अनेक छोटी-मोठी हॉटेल्स, लॉन्स आणि मंगलकार्यालयं आहेत. लगीनसराईत त्यांचं बुकींग देखील फुल्ल झालेलं आहे अशावेळी या कारवाईमुळे या मंगलकार्यालयांच्या मालकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

अधिक वाचा  पुण्यात धक्कादायक प्रकरण उघडकीस,संशयित दहशतवाद्याला अटक