समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य  यांची जोडी साउथ इंडस्ट्रीमध्ये टॉपवर होती. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 2017 मध्ये दोघांनी लग्न केले, मात्र इंडस्ट्रीतील एवढ्या लाडक्या जोडप्याचे इतकं अचानक ब्रेकअप होऊ शकतं याची कुणी कल्पनाही केली नसेल. बरं, विभक्त झाल्यानंतर, दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत आणि त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत.

अशा परिस्थितीत नागा चैतन्यबाबत एक बातमी समोर येत आहे, जी धक्कादायक आहे. ही बातमी ऐकून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. असे सांगितले जात आहे की नागा चैतन्य आणि समंथा यांनी घटस्फोट घेऊन एक वर्ष पूर्ण व्हायला आले आहे आणि आता चैतन्यने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा  आगामी महापालिकेच्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीची रणनीती?,शहरात महामोर्चाचे आयोजन

समोर येत असलेल्या बातम्यांनुसार, लवकरच आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या नागा चैतन्यने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याबाबत अभिनेता किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर, यावेळी देखील अभिनेता अभिनेत्रीसोबत लग्न करणार की अन्य कोणाशी हे देखील स्पष्ट झालेले नाही.

आता तो कोणत्याही अभिनेत्रीसोबत लग्न करू इच्छित नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे तो इंडस्ट्रीबाहेरील कोणाशी तरी लग्न करण्याच्या तयारीत आहे. सामंथा रुथ प्रभूपासून घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य खूपच तुटल्याचेही सांगितले जात आहे. या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांनाही उत्सुकता आहे.

अधिक वाचा  'पुष्पा 2'ची रिलीज डेट लीक! ‘या’ दिवशी चित्रपगृहांत घालणार धुमाकूळ

याशिवाय अभिनेत्याच्या डेटींगबद्दल बोलायचे झाले तर, समंथापूर्वी नागाचे नाव श्रुती हासनसोबतही जोडले गेले आहे. बातम्यांनुसार, नागाला श्रुतीसोबत लग्न करायचे होते, पण तसे होऊ शकले नाही. काही कारणांमुळे दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर काही वेळातच समांथाने त्यांच्या आयुष्यात प्रवेश केला आणि दोघांनी 2017 मध्ये एकमेकांशी लग्न केले.