सांगली :- एमआयएम भाजपाची ‘बी’ टीम आहे, असे आम्ही ऐकत होतो. आता खाज साहेबांची मनसे  भाजपाची ‘सी’ टीम झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीने आमदार अमोल मिटकरी  यांनी केली. राज ठाकरे  यांचा ‘खाज साहेब’  असा उल्लेख करून त्यांची टिंगल आणि नक्कल केली. ते इस्लामपूर येथे ‘राष्ट्रवादीच्या परिवार संवाद सभे’त बोलत होते. .

सोशल मीडियावर नेटीजन्स मिटकरी यांना ट्रोल करत आहेत. यासाठी संताप व्यक्त करताना ते म्हणालेत की, मी कुणाला घाबरत नाही, त्यांची (मनसे) आणि भाजपाची लावारीस कार्टी धमक्या देण्याशिवाय काही करू शकत नाही.

अधिक वाचा  आता विधवांनाही सन्मान; 'हेरवाड ग्रामपंचायतीचा पॅटर्न' राज्यभर

राज ठाकरेंनी आधी मराठीचा मुद्दा उपस्थित केला. त्यासाठी, शिवाजी महाराजांचा मुद्दा उपस्थित केला, असे म्हणत मिटकरींनी राज ठाकरेंची नक्कलही करून दाखवली. मनसेचा ५ रंगाचा झेंडा आता एका रंगावर आला आहे. त्यावर राजमुद्रा आहे, पण त्यांच्याच पक्षाच्या एकाला मी राजमुद्रा विचारली, तर आम्हाला नाही विचारायचे असे म्हणाला. तुमचा पक्ष १४ आमदारांवरुन १ आमदारावर ऐऊन ठेपला आहे. आता तर मुस्लीम मतदारही तुमच्याकडून दुरावलाय, अशी टीका मिटकरी यांनी केली.