मुंबई :- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे  यांनीही राज ठाकरे  यांच्यावर निशाणा साधला आहे.मुंडे यांच्या टिकेला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची ‘अर्धवटराव’ म्हणून खिल्ली उडवताय, ते राजसाहेब तुमच्यासारख्या ‘तात्या विंचू’चा ओम फट स्वाहा करणार आहेत. राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे, लवकरच तुमचा थरथराट होणार. Get Well Soon धनंजय मुंडे, असे ट्वीट करत खोपकर यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.

दरम्यान राज ठाकरे हे भाजपचे भोंगे म्हणून काम करीत आहेत. पण पूर्वी शाळेत असताना अर्धवट नावाचे पात्र असायचे.बाहूलाच्या तोंडून बोलायचे हे पात्र. अशा बाहुलच्या तोंडून हे बोलतात.या अर्धवट रावांच्या मागे ईडीचा परिणाम असा झाला की ‘लाव रे ती सीडी’ म्हणणारे आता सगळे विसरून गेले आहेत. माणस सत्तेत आली की कशी माजतात हे मागच्या पाच वर्ष्यात आपण पाहिले आहे, अशी टीका मुंडे यांनी राज ठाकरेंवर केली .

अधिक वाचा  बॉक्स ऑफिसवर ‘धर्मवीर’ नावाचं भगवं वादळ कायम, तीन दिवसांत जमवला 9.08 कोटींचा गल्ला