शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी हल्ला झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते आणि अन्य ११४ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला. सदावर्ते यांना या प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मात्र, त्यांच्यामागे आता चौकश्यांचा ससेमिरा लागलाय.

कोल्हापूर, सातारा, अकोला अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने विविध प्रकरणांमध्ये चौकशीसाठी त्यांची पोलीस कस्टडी मागण्यात येत आहे. त्यांच्या पत्नीवरही गुन्हा दाखल झाल्याने त्या देखील अडचणीत आल्या आहेत. दरम्यान, सदावर्तेंनी प्रत्येक कामगाराकडून ३०० ते ५०० रुपये वर्गणी घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यावर मोठा खुलासा झाला आहे.

पुढील तपासासाठी सदावर्तेंची पोलीस कस्टडी हवी असल्याची मागणी सरकार वकील प्रदिप घरत यांनी केली आहे. त्यांनी हर्षद मेहता प्रकरणाचा निकाल सदावर्ते प्रकरणात रेफरन्स म्हणून वाचून दाखवला. यावर सदावर्तेंनीही युक्तीवाद केला आहे मी चौकशीत सहकार्य करत आहे. जयश्री पाटील यांना अटकपूर्व जामीन कोर्टाने मंजूर केला आहे. त्यामुळे माझे मूलभूत हक्क कोर्टाने अबाधित ठेवावे, असं सदावर्तेंनी म्हटलंय.

अधिक वाचा  कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरण; आर्यन खानला एनसीबीकडून क्लिनचिट

कागदपत्र जप्त केले ते वकालतनामा आहेत. माझ्या प्रकरणात हर्षद मेहता प्रकरणाचा दाखला देण्यात आला, हे दुःखद आहे. नोट मोजायचे मशीन 3000 रुपयांची आहे. कामकाजाच्या सुविधेसाठी ती घेण्यात आल्याचं सदावर्तेंनी स्पष्टीकरण दिलंय. मी मालमत्ता घेतल्या त्या सर्व बँकांच्या रेकॉर्ड्सवर असल्याचं ते म्हणाले.