मुंबई : टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमींची पत्नी हसीन जहां तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टनं नेहमीच वादग्रस्त असते. शमीवरही तिने काही वर्षांपूर्वी गंभीर आरोप केले होते. आता एका ताज्या प्रकरणात हसीन जहां स्वत:च वादात सापडली आहे. तिच्यावर तिच्या आई-वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर, हसीन जहांचे वडील मोहम्मद हुसेन यांनी तिला संपत्तामधून बेदखल करत असल्याचंही जाहीर केलं आहे.

हसीन जहांवर तिच्या भावाच्या संपत्तीचा बेकायदेशीर ताबा घेतल्या आरोप आई-वडिलांनी केलाय. या प्रकरणात हसीनच्या वडिलांनी तिला एक नोटीसही पाठवली असून ती नोटीस त्यांनी सार्वजनिक केलीय.’झी न्यूज’ नं दिलेल्या वृत्तानुसार मोहम्मद हुसेन यांनी सांगितले की, त्यांचा एकलुता एक मुलगा तारिक परवेझ उर्फ बंटीचा गेल्या वर्षी कोव्हिडमुळे मृत्यू झाला. बंटीच्या मृत्यूनंतर हसील जहांनं त्याच्या सर्व संपत्तीवर कब्जा केला आहे.

अधिक वाचा  राज ठाकरेंची अशी तयारी... धमकीला मनसेची केराची टोपली

हसीननं तिच्या भावाच्या नावावर असलेले 2 ट्रक, कार, बाईक, हॉटेल, पेट्रोल पंप, कोळशाची खाण आणि लाखो रूपयांची आयुर्विमा पॉलिसी ताब्यात घेतलीय, तसंच त्या घरगुती सामानाचाही ताबा घेतलाय, असा दावा हुसेन यांनी केलाय.

हुसेन यांनी त्यांचे वकील अमित कुमार यांच्या हवाल्यानं दावा केलाय की, ‘मुस्लीम पर्सनल लॉच्या नियमानुसार वडील जीवंत असताना मृत मुलाच्या संपत्तीचा हक्क हा विवाहित बहिणीला नाही तर त्यांना मिळतो. हसीनच्या आई नाजमा खातून यांनी मुलीला संपत्ताचा ताबा मागितल्यावर तिने त्यांना शिवीगाळ केली आणि मारहाणही केली. हसीनच्या दबावामुळे पोलीस ही या प्रकरणाची दखल घेण्यास किंवा तिच्यावर कारवाई करण्यात टाळाटाळ करत आहे, असे तिच्या आईनं सांगितल्याचा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.

अधिक वाचा  “परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट”, सरसेनापती हंबीरराव’चा जबरदस्त टीझर रिलीज

हसीनच्या आई-वडिलांनी यावेळी तिच्यावर छळ करणे आणि संपत्तीचा अवैध ताबा घेण्याबाबत कोलकाता हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील सोनातोर पारा सुरीमध्ये राहणाऱ्या हसीनच्या आई-वडिलांनी त्यांच्या मुलीसोबत तिचे मित्र सुब्रत मुखर्जी, 2 कर्मचारी कांती पॉल, सुरेश आणि त्यांची सुन जूही यांच्यावरही आरोप दाखल केले आहेत. जूही तिच्या नवऱ्याचा मृत्यू होण्याच्या पूर्वीपासूनच वेगळी राहात होती.