मुंबई : कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आम्ही तयार आहोत. जातीय आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर कादेशीर कारवाई होणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमांना बोलताना स्पष्ट केलं. भोंग्याच्या प्रकरणावरुन सध्या महाराष्ट्रभर राजकारण तापलं असून प्रशासनाकडून शांततेच आवाहन केलं जात आहे. आम्ही राज्यातील पोलिस महासंचालकांना जिल्ह्यातील पोलिस आयुक्तांसोबत बैठका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. आणि महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारची अशांतता होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं.

अमरावतीत सध्या सुरु असलेल्या तणावाबद्दल बोलताना ते म्हणाले, काही घटक जास्त सक्रिय असल्याने तेथे तणाव निर्माण झाला आहे. त्या घटकांचा बंदोबस्त केला पाहिजे असं ते म्हणाले. राज ठाकरे यांना केंद्रीय सुरक्षा देण्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, हे तर राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण आहे, राज्य सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षेसाठी सक्षम असून केंद्रीय सुरक्षेचा वापर कसा करायचा हे त्यांनी ठरवावं. असं ते म्हणाले.

अधिक वाचा  तारक मेहता...' चाहत्यांना धक्का! शैलेश लोढा नंतर 'बबिता जी' शो सोडणार?