शिवसेनेने खुर्चीसाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी हिंदुत्वाशी गद्दारी करुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात धरला आहे. बाळासाहेबांनी कधीही हिंदुत्वाशी तडजोड केली नव्हती. मात्र, मागील दोन वर्षात शिवसेना पक्षप्रमुखांनी हिंदुत्वाबाबत काय भूमिका घेतल्या, हे सर्व महाराष्ट्राने बघितले आहे. यांना कारवाई करण्यासाठी फक्त माझेच घरं दिसतं, मात्र बेकायदेशीर भोंगे दिसत नाही का? यांनी कोल्हापूर पॅटर्न जगात राबवला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. पुढच्या निवडणुकीत आमचे 160 आमदार असणार आहेत, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

अधिक वाचा  "पुण्य आपल्या पदरात पाडून घ्या” मनसेचे शिवसेनेवर टीकास्त्र

माझ्या घरासंबधी केलेली कारवाई कायदेशीर केली नसून करण्य़ात आलेली कारवाई ही फक्त राजकारणासाठी केली आहे. पालिका आयुक्तांना केवळ माझं एकट्याचं घर दिसतंय का? इतर ठिकाणी ते डोळे झाकून फिरतात का? तसेच मुख्यमंत्रीही सूडाच्या भावनेने कारवाई करत आहेत. मात्र, अशा कारवायांना मी भीक घालत नाही. अशा कारवाई करून आम्ही शांत बसू असं त्यांना वाटतयं मात्र, त्यांचा तो गैरसमज आहे. माझ्याकडे अनेकांचे रेकॉर्ड आहेत, वेळ आली की उघडे करेन, असा गर्भित इशाराही राणेंनी शिवसेनेला दिला आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसून राज्य दिवाळखोरीत चालल आहे. मुख्यमंत्र्यांची जरब नसून अडीच वर्षांचा कारभार मुख्यमंत्र्यांनी दोन तासांत उरकला आहे. हे सरकार लोकांचे प्रश्न सोडवू शकत नाही. हे काय माझ्या अंगावर येतील या टपोरी लोकांना मी उत्तर देत नाही. पैसे मिळवण्याचे एक ठिकाण पालिका झालं असून हे मुंबईचे पैसे लुटत आहेत. तसेच, कोल्हापूर पॅटर्न यांनी जगात राबवला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. पुढच्या निवडणूकित आमचे 160 आमदार निवडूण येतील. हे डबक्यात राहून समुद्राचे माप घेत आहेत, अशा शब्दात राणेंनी मुख्यमंत्र्यांवर व महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

अधिक वाचा  निलेश राणेंचं छत्रपती संभाजीराजेंना ट्विट करुन आवाहन, म्हणतात, लाथ मारा त्या..

दरम्यान, राज ठाकरेंच्या भोंगे हटाव भूमिकेला राणेंनी पाठिंबा देत म्हणाले की, बेकायदेशीर भोंग्यांना आमचा विरोध आहे. जर कारवाई करायला माझं घर दिसते मग यांना बेकायदेशीर भोंगे दिसत नाही का?, असा सवालही राणे यांनी सरकारला विचारला आहे.