रिहे (मुळशी)-  या क्षेत्रात खूप प्रमाणात झाडे आहे व नवीन रोपांची लागवड ही केली आहे. दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात जंगलात आग लागण्याचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर घडत असतात. यामुळे जंगलातील लाख मोलाच्या संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच जंगलात वास्तव्यात असलेल्या वन्य प्राण्यांसह हजारो जीव- जंतू व पक्ष्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होतो. या सर्व बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. या सर्व बाबी लक्षात घेत श्री.राजाराम पडळघरे व सचिन भोसले यांनी गेली पाच वर्षीपासून वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकाला वणव्याची माहिती देऊन आग विजवण्यास मदत करत आहे.

अधिक वाचा  उजनी धरणात ६ टीमएसी साठा; सोलापूरसाठी ११० किमीची जलवाहिनी होणार

मुळशी तालुक्याचे वन विभागाचे अधिकारी श्री.पोपटराव कापसे हे वेळोवेळी मदत करतात होते मग ती रात्र असू की दिवस ,वनरक्षक श्री.आर. एम.चौरे यांनी ही खूप मदत केली,पण या वर्षीही जाळ रेषा न काढल्यामुळे खूप नुकसान झालेआणि फोन करून लवकर न आल्याने आग आटोक्याच्या बाहेर गेली ही सर्व प्रकारची माहिती वनरक्षकांना श्री. अशोक पडळघरे फोन करून दिली.