बाबा सिद्दीकींची इफ्तार पार्टी ही बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या पार्ट्यांपैकी एक समजली जाते.रमजानच्या महिन्यात बाबा सिद्दीकी प्रत्येक वर्षी इफ्तार पार्टीचं आयोजन करतात. या पार्टीला बॉलिवूडमधील सिनेकलाकार हजेरी लावतात.बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांनी यावर्षीही अलिशान इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला अभिनेत्री शिल्पा शेट्टीपासून ते २०२१ ची विश्व सुंदरी हरनाझ संधू पर्यंत अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

कलाकारांच्या या गर्दीत लक्ष वेधलं ते बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि भाईजान सलमान खानने.बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमुळेच सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात पुन्हा मैत्री झाली होती. या पार्टीत दोघांच्या उपस्थितीकडे सगळ्यांच्यांच नजरा असतात.यावेळी शाहरुख खान आणि सलमान खान ब्लॅक लूकमध्ये दिसले.

अधिक वाचा  केतकीचे वय बघता वॉर्निंग देऊन सोडून द्या;पंकजा मुंडेंचे शरद पवारांना आवाहन

शाहरुख खान आणि सलमान खान यांचे इफ्तार पार्टीतील लूकचे फोटो समोर आले असून, त्याची चर्चा होत आहे.शाहरुख खान रमजान आणि इफ्तार पार्टीमुळे ब्लॅक पठाणी सूट परिधान करून आला होता. सलवार कुर्तामध्ये शाहरुख खानचा लूक सगळ्यांपेक्षा वेगळा वाटत होता.सलमान खानही इफ्तार पार्टीत ब्लॅक लूकमध्ये दिसून आला. सलमान ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक जिन्स घातलेली होती. सलमान त्याचे वडील सलीम खान यांच्यासोबत इफ्तार पार्टीला आलेला होता.