मुंबई: ‘आयएनएस विक्रांत’ साठी पैसे गोळा करुन घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर मुंबई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज मुंबई पोलिसांनी सोमय्या यांची तब्बल तीन तास चौकशी केली. या चौकशीनंतर सोमय्या यांनी प्रतिक्रीया दिली. मी पोलिसांना सर्व सहरार्य केलं आहे, असं किरीट सोमय्या  म्हणाले.

आयएनएस विक्रांत प्रकरणी सोमय्या यांची मुंबई पोलिसांनी तीन तास चौकशी केली आहे. ‘मी या प्रकरणी पोलिसांनी सहकार्य केलं आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. सत्याचा विजय होईल असंही माजी खासदार किरीट सोमय्या  म्हणाले.

अधिक वाचा  पवारांचं पुण्यात नवं समीकरण? ब्राह्मण समाजासोबत बैठकीतून हे साध्य होणार?

मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच, अटक झाल्यास ५० हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे त्यांची अटकेपासून सुटका झाली आहे. सोमय्या आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली पैसे गोळा करुन घोटाळा केला असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत  यांनी केला आहे. आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्याकरिता जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयामध्ये पोहचले नसल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही माहिती समोर आली असल्याचे शिवसेना  खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.