पुणे : काँग्रेसने महागाईविरोधात अनोखे भोंगा आंदोलन केले. पेट्रोल पंपावर भोंगा लावून पेट्रोल दरवाढ विरोधात आंदोलन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा भोंगा वाजवला. यावेळी संपूर्ण राज्यात पेट्रोल पंपावर भोंगे लावून विद्यार्थी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्याचा इशारा संकेत गलांडे यांनी दिला.

महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस संकेत गलांडे यांनी वडगाव शेरी पुणे येथे पेट्रोल पंपावर भोंगा लावून पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात आंदोलन केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेल दरवाढ होणार नाही, या विषयावर केलेले भाषण आणि क्या हुआ तेरा वादा हे गाणं भोंग्यावर लावण्यात आले.

अधिक वाचा  लालपरी राज्यभर सुसाट दररोजचे उत्पन्न १७ कोटींवर; दीड महिन्यात ५२१ कोटींची कमाई

सध्या राज्यात भोंग्यावरुन जोरदार राजकारण सुरु आहे. काही पक्ष मूळ मुद्यांना बगल देत जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसतर्फे आम्ही पेट्रोल डिझेल दरवाढीचा ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी पेट्रोल पंपावर भोंगे लावून आंदोलन केले. आमचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या सहमतीने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक पेट्रोल पंपावर भोंगे लावून आंदोलन करु आणि त्याच बंगल्यांवर क्या हुआ तेरा वादा गाणं आणि नरेंद्र मोदी यांनी केलेली पेट्रोल डिझेल संदर्भातील खोटी भाषण लावण्यात येईल, अशी माहिती संकेत गलांडे यांनी दिली.