नवी दिल्ली – पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. शहबाज शरीफ यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहित दोन्ही देशांमध्ये अर्थपूर्ण संबंध देऊ केला आहे.

शहबाज शरीफ पाकिस्तानचे 23वे पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी शरीफ यांचं अभिनंदन केलं होतं. तर शहबाज शरीफ यांनी आता पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाला उत्तर म्हणून हे पत्र लिहिलं असल्याचं म्हटलं जात आहे.

पाकिस्तानला भारतासोबत शांततापूर्ण आणि सहकार्याचे संबंध हवे आहेत. पाकिस्तानला जम्मू-कश्मीरसह सर्व प्रश्नांवर शांततापूर्ण तोडगा हवा आहे. दहशतवादाविरूद्ध लढताना सर्वांना पाकिस्तानचं बलिदान माहिती आहे, असं शरीफ यांनी पत्रात नमूद केलं आहे.

अधिक वाचा  "केतकी चितळेने पवारांविषयी लिहलेली फेसबुक पोस्ट अतिशय...'', सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

दरम्यान, शरीफ यांनी पंतप्रधान मोदिंना लिहिलेल्या पत्रात काश्मीसह वादग्रस्त प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. तर पाकिस्तान भारतासोबत शांततापूर्ण आणि सहकार्यपूर्ण संबंधांना अनुकुल असल्याचं देखील पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.