पुणे : मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांनी नवा आपत्कालीन आराखडा तयार केला आहे.त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वारंवार तसेच वीकेंडला होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलिसांनी आपत्कालीन आराखडा तयार केला आहे. यामुळे वाहतूक कोंडीच्या वेळी महामार्गावर वाहनांच्या रांगा न लागता, त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करुन ती वाहने पुन्हा महामार्गावर येतील, अशी व्यवस्था करण्यावर भर देण्यात आला आहे.

असा करणार बदल

94 किलोमीटरचा संपूर्ण मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग 15 टप्प्यांत विभागला गेला आहे, ज्यात ‘यू’ टर्न, सर्व्हिस लेनमध्ये प्रवेश, निर्गमन आणि नंतर मुंबई-पुणे महामार्गावर जाण्यासाठी योग्य मार्ग आहेत. या ठिकाणी बॅरिकेड्‌स आणि डायव्हर्शन बोर्डसह पुरेसे मनुष्यबळ तैनात करण्यात येतील. ज्या भागात अपघात झाला आहे. त्या भागातून वाहने सुरक्षितपणे बाहेर काढली जातील आणि अपघातस्थळाला बायपास करुन पुढे जातील, असे नियोजन आहे. वाहने पुन्हा द्रुतगती मार्गावरुन प्रवास सुरु करतील, असे महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालयाकडे वर्ग- सुप्रीम कोर्ट

विविध रसायने, वायू (एलपीजी/सीएनजी), तेले आणि इतर घातक पदार्थांचे आम्ही वर्गीकरण केले आहे. जे आपत्कालिन किंवा अपघातावेळी व्यवस्थापित करणे धोकादायक असते. जे घातक पदार्थांची हाताळणी करणाऱ्या सर्व कार्यालयांशी आम्ही संपर्क साधला. अपघात किंवा गळती झाल्यानंतर विशिष्ट वेळेत घटनास्थळी पोहोचण्यासाठी आणि द्रुतगती मार्गावरुन वाहने बाहेर काढण्यासाठी योजना तयार केली आहे, असे महामार्ग पोलिसांनी सांगितले.