पुणे : अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीला सलग तीन दिवस मारहाण करत भिंतीवर डोके आपटून खून करण्यात आल्याची धक्का दायक घटना आंबेगाव बुद्रुक येथे श्रीकृष्ण अपार्टमेंटमध्ये घडली.

याप्रकरणी एका २४ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली असून त्या नूसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात मुलीच्या सावत्र बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जितेंद्र उत्तम पाटील (वय ३३ वर्षे) यास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील हा एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहिती नूसार फिर्यादी महिलेचा जितेंद्र याच्याबरोबर चार महिन्यापूर्वी विवाह झाला होता. विवाह करताना ती घटस्फोटीत असून तीला तीन वर्षाची मुलगी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र महिनाभरापुर्वीच जितेंद्रला आपली पत्नी घटस्फोटीत नसून तीची मुलगी अनैतीक संबंधातून जन्माला आल्याचे समजले. या मुळे तो सातत्याने चिडचिड आणि मुलीचा राग करत होता.

अधिक वाचा  बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? कोणते स्पेअर पार्ट घातले होते, मी मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार..

त्याने १३ एप्रिल रोजी रात्री मुलीला आईसमोर हाताने मार हाण करुन पाय धरुन उलटे करत फिरवली होती. तसेच डोके भिंतीला आदळून तीला जखमी केले होते. यानंतर पुन्हा १५ एप्रिल रोजी मुलगी झोपली असता तीच्या गालाला थापडी मारुन तीचे पाय पकडून तीला कॉटवरुन खाली ओढले. यानंतर तीला डोक्‍याच्या दिशेने भिंतीवर आपटून जीवे ठार मारले. मुलगी निपचीत पडल्यावर आईने धावाधाव करत तीला रुग्णलयात नेले.

मात्र तेथे डॉक्‍टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. डॉक्‍टरांनी याची खबर पोलिसांनी दिली. शवविच्छेदन अहवालात मुलीला मारहाण केल्याचे निष्पन्न झाले.फिर्यादी महिलेचे पुण्यात कोणीच नातेवाईक नाहीत. यामुळे मुलीला पती मारहाण करत असल्याने ती घाबरुण गेली होती. यानंतर पोलिसांनी तीला विश्‍वासात घेतल्यावर खरी घटना उघडकीस आली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आशीष कवठेकर करत आहेत.