रिहे (मुळशी)- दि. 16 एप्रिल 2022 रोजी शालेय शिक्षण विभाग, भारत सरकार, महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद(SCERT) महाराष्ट्र, महिला व बालकल्याण विभाग, पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे द्वारा व पंचायत समिती मुळशी यांच्या संयुक्त विद्यमानाने अंतर्गत इयत्ता पहिलीला दाखल पात्र विद्यार्थ्यांचा शाळापूर्व तयारी मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिहे येथे संपन्न झाला.

पहिलीला दाखल पात्र विद्यार्थ्यांचे मागील दोन वर्षात करुणा च्या काळात झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढणे, इयत्ता पहिली 2022 मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे, NEP 2020 च्या अंमलबजावणीस प्रारंभ करणे यात बालक पहिलीला येण्यापूर्वी त्याच्यामध्ये ज्या क्षमता संपादित व्हायला पाहिजे त्या क्षमता शाळापूर्व तयारी व्हायला पाहिजे हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून शाळापूर्व अभियानाचे आयोजन करण्यात आले.

अधिक वाचा  महापालिकेचा कार्यकाळ संपला तरी स्थायी समितीचे अस्तित्व कायम राहते, न्यायालयात याचिका दाखल

रिहे गावचे माजी सरपंच श्री. भूषण बोडके, ग्रामपंचायत सदस्य नाना शिंदे, गोपाळ शिंदे, अशोक पडळघरे, विकास शिंदे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नीता शिंदे, सहशिक्षिका सौ मनीषा चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ. पूनम रोडे, अंगणवाडी ताई सौ. प्रमिला जगताप, अंगणवाडी मदतनीस सौ. ज्योती शिंदे, सौ. शोभा बोरकर, सौ. प्रियांका गाडे, सौ. निकिता बोरकर, सौ. मनीषा बोरकर, श्री. दत्तात्रय आखाडे, सौ. चैत्राली भिंताडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. वैशाली शिंदे उपस्थित होते.

रिहे शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी शाळापूर्व तयारी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नीता शिंदे यांनी त्यांच्या स्वखर्चाने इयत्ता पहिलीच्या 2022 दाखल पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. तसेच त्यांनी उपस्थित मान्यवरांना शाळा डिजिटल करण्यासाठी मदतीची मागणी केली. सहशिक्षिका सौ. मनीषा चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.