कर्वेनगर-वारजे परीसरातील वेदांत नगरी येथे रिक्षा स्टँड नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. याबाबत अनेक नागरिकांनी  नगरसेविका सौ. लक्ष्मीताई दुधाने यांची भेट घेऊन याठिकाणी रिक्षांची सोय करण्याची विनंती केली होती.

नवीन रिक्षा स्टँड करण्याकरिता लागणारी मा. जिल्हाधिकारी, पोलिस विभाग यांच्या परवानगी मिळण्यास काही तांत्रिक कारणांमुळे प्रलंब झाला. पण नगरसेविका सौ. लक्ष्मीताई दुधाने यांच्या माध्यमातून सतत केलेला पाठपुरावा आणि प्रयत्नांतून आज सकाळी याठिकाणी नव्या रिक्षा स्टँडचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे.

व्यंकटेश हेरिटेज सोसायटीमधील मा. डॉ. चित्रा आगाशे यांच्या शुभहस्ते आणि श्री. नितीनजी पवार सर आणि श्री. आनंदजी तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्याप्रसंगी प्रभागातील अनेक नागरिक आणि रिक्षा व्यावसायिक यांनी उपस्थित राहत कार्यक्रमाची शोभा वाढवली. या स्टँडमुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार असून भविष्यातही नागरिकांच्या सेवार्थ आम्ही सदैव तत्पर राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू असे श्री. स्वप्नील दुधाने उपाध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी सांगितले.

अधिक वाचा  ठाकरेंनी फडणविसांना धु-धु धुतले : षंढासारखे (स्लेजिंग) करु नका: संस्थांचा गैरवापर न सोडल्यास धडा नक्कीच...