आर माधवन हा हिंदी चित्रपट जगतातील प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने चित्रपट जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मात्र सध्या आर माधवनपेक्षा त्याच्या मुलाचीच सर्वात जास्त चर्चा होताना दिसत आहे. आर माधवनचा मुलगा वेदांंत माधवन प्रसिद्ध जलतरणपटू आहे. याआधीही त्याने अनेक गाजलेल्या स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले असून, आता आणखी एकदा आपल्या दमदार कामगिरीने देशाची मान उंचावली आहे. आपल्या मुलाच्या या मोठ्या यशाचे आर माधवनने खास शब्दात कौतुक केले आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, Danish Open २०२२ ही स्पर्धा १५ एप्रिल ते १९ एप्रिल दरम्यान कोपनहॅगनमध्ये पार पडत आहे. या स्पर्धेत भारतीय तरुणांनी स्विमिंगमध्ये चमकदार कामगिरी केलेली पाहायला मिळत आहे. स्पर्धेत साजन प्रकाशने सुवर्ण पदकाची, तर अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत माधवनने रौप्य पदकाची कमाई केली आहे. वेदांतच्या या घवघवीत यशाबद्दल अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. वेदांत माधवनने १५०० फ्री स्टाइल स्विमिंग प्रकारात रौप्य पदक कमावले आहे. स्पर्धत चमकदार कामगिरी करताना १५ः ५७ः ८६ः अशा विक्रमी वेळेची नोंद केली आहे.

अधिक वाचा  शैलेश लोढा यांना मिळाला मोठा प्रोजेक्ट, तारक मेहताचा उल्टा चष्मा सोडल्यानंतर करणार हे काम