मुंबई – सध्या महाराष्ट्र असेल किंवा देशाच्या राजकारणात रोज नवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. कोणत्या कोणत्या मुद्दयावरून नेत्यांचे वाद तर वक्तव्य चर्चेत असतात.

या सगळ्या प्रकारावर अनेक कलाकार सोशल मीडिया मत मांडताना दिसतात. नाटक आणि सिनेमा गाजवणारा प्रसिध्द अभिनेता संदीप पाठक यानेही या सगळ्या प्रकारवर सोशल मीडियावर मत मांडलं आहे. संदीप पाठकनं  राजकीय नेते यांच्याबाबत केलेलं ट्वीट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. अभिनेता संदीप पाठकनं त्याच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून नुकतंच एक ट्वीट केलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये त्यानं म्हटलं आहे की, ‘सर्व राजकीय नेते आपआपसात भांडत आहेत. परंतु एकही पक्ष किंवा एकही नेता सामान्य जनतेच्या समस्येबद्दल एक चकार शब्द बोलत नाही. महागाई, वीजटंचाई, पाणी समस्या.’ संदीप पाठकचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर बरंच व्हायरल झालेलं पाहायला मिळत आहे. अजय पुरकर यांच्यानंतर आणखी एका अभिनेत्री सोडली ‘मुलगी झाली हो’ मालिका सध्या देशात महागाईचा भडका उसळला आहे.

अधिक वाचा  नवनीत राणा यांचा उल्लेख `अमरावतीची भाकरवडी`,दिपाली भोसलेंनी नवनीत राणांना डिवचलं!

पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. यावरून मराठमोली अभिनेत्री हेमांगी कवी हिनं देखील फेसबुत पोस्ट करत मत मांडलं होतं. शिवाय असे अनेक कलाकरा आहेत जे सध्याच्या देशातील परस्थितीवर भाष्य करताना दिसतात. पण यापैकी अनेकांना कधीकधी ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो.

संदीपनं आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याच्या अभिनयातील कारकिर्दी विषयी सांगायचे झाल्यास 2004 साली श्वास या चित्रपटातून तो पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकला. त्यानंतर त्याने एक डाव धोबी पछाड, वन रूम किचन, पोस्टर गर्ल अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.