अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वजणच आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील गाण्यांनी आणि चंद्राची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अमृता खानविलकरने तर चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे.

अमृता खानविलकरने चित्रपटात केलेले नृत्य पाहून चाहते पूर्णपणे घायाळ झाले आहेत. या चित्रपटातील लावणीचे नृत्य दिग्दर्शन ‘लावणीकिंग’ आशिष पाटील यांनी केले आहे. नुकतीच आशिष पाटील यांची चित्रपटाविषयी एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

या पोस्टमध्ये स्वतः आशिष पाटील अमृताचे नृत्य पाहून थक्क झाल्याचे दिसत आहेत. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आशिष पाटील यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अमृता खानविलकरचे तोंडभरून कौतुक केले आहे. तसेच तिच्या नृत्याला पाटील यांनी दाद दिली आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिकेचे SC आणि ST चे आरक्षण जाहीर; आता महिला आरक्षण सोडतीकडे लक्ष

आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये आशिष पाटील यांनी म्हटले आहे की, “अमू… तुझी निष्ठा, आवड आणि नृत्य शिकण्याची तीव्र भावना याबद्दल मी काय बोलू. अनेक दिवस, तासनतास चालणारी तालीम आणि तू तुझ्या ज्या उर्जेने हे गाणे केले आहे, ते पाहून मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो. या गाण्याच्या शूटींगदरम्यान काढलेला हा फोटो अपलोड करण्यासाठी मी फारच उत्सुक होतो.

मला ‘बाई ग’ गाण्याच्या दिग्दर्शनाची संधी दिल्याबद्दल आणि माझ्या कलेवर विश्वास दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद…’चंद्रमुखी’साठी खूप शुभेच्छा आणि हो हा चित्रपट ‘सुपर से उपर वाला’ असणार आहे” अशा शब्दात त्यांनी चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आशिष पाटील यांनी अमृताचे कौतुक केले आहे.

अधिक वाचा  'महिला असली तरी छपरीच तू', केतकी चितळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल

दरम्यान चंद्रमुखी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटातील गाणी सुपरहिट ठरली आहेत. या चित्रपटातील गाण्यांना अजय-अतुल यांचे संगीत लाभले आहे. तर या चित्रपटातील ‘बाई गं…’ लावणीचे नृत्यदिग्दर्शन आशिष पाटील यांनी केले आहे. आशिष पाटील संपूर्ण महाराष्ट्रात नृत्यदिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत.