संपूर्ण महाराष्ट्रात बहुचर्चित असणाऱ्या ‘मुलगी झाली हो’ मालिकेत वेगवेगळ्या घडामोडी पाहिला मिळत आहेत. अभिनेता किरण माने यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतर मालिकेचा टीआरपी देखील कमी झालेला दिसत आहे. मुख्य म्हणजे, लवकरच ‘मुलगी झाली हो’ मालिका बंद पडणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर ‘मुलगी झाली हो’ मलिकेसंदर्भात आणखीन एक बातमी समोर आली आहे. अभिनेते अजय पुरकर यांनी मालिका सोडल्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता आंबिकरने देखील मालिका सोडली आहे. अद्याप यामागील कारण समोर आलेले नसले तरी मालिकेतील वादाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

अधिक वाचा  योगी आदित्यनाथजी तुम्हाला सलाम...अभिनेता सुमीत राघवनचे ट्वीट चर्चेत

‘मुलगी झाली हो’ मालिकेत श्वेता आर्याची भूमिका साकारत होती. मालिकेच्या सुरुवातीपासून आर्याचे पात्र सर्वांना आवडले आहे. आता श्वेताने मालिका सोडल्यामुळे तिच्या जागी नवीन अभिनेत्री घेण्यात येणार आहे. परंतु सध्या तरी या अभिनेत्री विषयी मालिका दिग्दर्शकांनी कोणताही खुलासा केलेला नाही.

श्वेता मालिका सोडत असल्याची माहिती पहिल्यांदा ‘मराठी सिरियल्स’ने दिली आहे. त्यांनी एक पोस्ट करत म्हणले आहे की, ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील आर्या हे पात्र साकारणारी अभिनेत्री श्वेता आंबिकर हिने ही मालिका सोडली आहे. तिने ही मालिका सोडण्यामागचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.

अधिक वाचा  पुण्यातही मंदिराच्या जागी उभारल्या मशिदी, मनसे नेते अजय शिंदेंचा दावा

आपल्या अभिनयातून श्वेता चाहत्यांच्या मनावर राज्य करत आली आहे. मात्र आता ती मालिका सोडणार असल्यामुळे तिची कमी सर्वांनाच भासणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेते अजय पुरकर यांनी फेसबुक पोस्ट करत मालिका सोडत असल्याचे सांगितले होते. त्यानंतरच आता श्वेता आंबिकर मालिका सोडणार असल्याचे समोर आले आहे.

किरण माने यांच्या प्रकरणानंतर ‘मुलगी झाली हो’ चर्चेत आली आहे. आता लवकरच या मालिकेची वेळ बदलणार आहे. या मालिकेच्या वेळेत ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. त्यामुळे ‘मुलगी झाली हो’ मालिका दुपारी २ वाजता दाखवण्यात येणार आहे.