महाराष्ट्र नवनिर्माण सेना व स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या २९ व्या भव्य रक्तदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांची उपस्थिती लाभणार आहे. सदर कार्यक्रम म न से कार्यालय एरंडवणे येथे १७ एप्रिल रोजी सकाळी १०-३० वाजता उद्घाटन करण्यात येणार असून यावेळी पुणे शहरातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दिवंगत माजी महापौर भाऊसाहेब खिलारे पाटील यांचे नावाने श्री संजय चौधरी पी एस आय ब्लड सेंटर -पुणे व संजय कुमार शिंदे अक्षय ब्लड बँक – पुणे यांना समाज भुषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  सर्व मशिदींचे उत्खनन करा, शिवलिंग सापडले तर आमचे अन्...; भाजप नेत्याचे ओवेसींना आव्हान

व आम्ही करत असलेल्या गेल्या २८ वर्ष आमच्या कार्यात सहभाग घेऊन आम्हांला समाजसेवे साठी सहकार्य मार्गदर्शन करणाऱ्यांपैकी एकुण १२ जणांना दिवंगत माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांचे नावे श्री संजय कुलकर्णी, राजीव बोडस, संजय चोरडीया सर, शाहीरराजे हेमंत मावळे, श्री जयंत देवरे, श्री समीर येणपुरे, इत्यादींना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार मा राजसाहेब ठाकरे यांचे हस्ते देण्यात येणार आहे.