मुंबई : कोल्हापूर उत्तर निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला तर हिमालयात जाईन असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते याची आठवण नेटकऱ्यानी पाटलांना करून दिलीय.

कोल्हापूर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा जवळपास १९ हजार मतांच्या फरकाने पराभव केलाय. जयश्री जाधव यांच्या विजयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सोशल माध्यमावर ट्रोल झाले आहेत.

काही नेटकऱ्यानी चंद्रकांत पाटील यांचे साधूच्या वेशातील मिम्स तयार केलेत. तर काही नेटकऱ्यानी त्यांना थेट हिमालयात पाठवले आहे.

दुसरीकडे पुण्यातील काही तरुणांनी ‘परत या, परत या, दादा परत या’ असे म्हणत त्यांना टोला लगावला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात ‘दादा हरवले आहेत’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. दोन महिने झाले आमच्या मतदारसंघाचे आमदार हरवले आहेत असेही त्या बॅनरवर लिहिण्यात आले होते. याची आठवण नेटकऱ्यानी पुन्हा करून दिलीय.

अधिक वाचा  धक्कादायक : पाच महिलांचा भाटघर धरणात बुडून मृत्यू |

दरम्यान, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे उपाध्यक्ष राज राजापूरकर यांनी सीएसटी रेल्वे स्टेशन गाठले आहे. कोल्हापूर उत्तर निवडणूक पराभव झाला तर हिमालयात जाईन असे भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यामुळे त्यांना हिमालयात पाठविण्यासाठी रेल्वे तिकीट काढायला आलो आहे, असे त्यांनी सांगितले.