राज्य शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे पुणे महापालिकेत सत्ता गेली असली तरीही मुरलीधर मोहोळ हे जनतेच्या मनात वसलेले महापौर असून त्यांच्यामध्ये कायम सेवेत राहण्याची भूमिका ही अभिमानास्पद असून त्याचाच एक भाग म्हणजे मुरलीधर मोहोळ यांनी सुरू केलेले २४x७ हे भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय सहभाग असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. कोथरूड भागात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या २४x७ भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय उद्घाटन व कोथरूड सांस्कृतिक महोत्सव उद्घाटनाच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार भीमराव अण्णा तापकीर, सुनील कांबळे यांच्यासह शहर व कोथरूड पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’चे नाव बदलले ,करणी सेनेच्या तक्रारीनंतर निर्णय

पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने उल्लेखनीय कार्य केल्यामुळे आज पुणे शहर एक वेगळ्या उंचीवर पोहोचले असून यामध्ये या सर्व पदाधिकारी लोकांची योगदान आहे. पुणे शहरातील कोरोना ची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असताना भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व महापौर मुरलीधर मोहोळ यांनी योग्य नियोजन केल्यामुळेच शहर कोरोना मुक्त झाले असून या कार्यामुळेच आजही महापौर मुरलीधर मोहोळ जनतेच्या मनातील महापौर असल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले. यावेळी पंडित शौनक अभिषेकी व महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनीही महापौर मुरलीधर मोहोळ यांचे कौतुक केले.

अधिक वाचा  पुण्यातही मंदिराच्या जागी उभारल्या मशिदी, मनसे नेते अजय शिंदेंचा दावा

राजकीय कार्यकर्त्याचे जनसंपर्क कार्यालय जनतेच्या समस्यांना निपटारा करणारे किंवा त्यांना जनतेशी संपर्क साधणारे केंद्र असते. पाच वर्षे शहर पातळीवर काम करीत असल्यामूळे परिपूर्ण जनसंपर्क कार्यालयाची आवश्यकता आणखी तीव्रतेने जाणवली. नागरीकांशी संवाद साधणे, समस्या सोडविणे व जनतेला २४ तास सेवा उपलब्ध करुन देणे यासाठी सुसज्ज कार्यालय विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. त्याच विचारांतून आता कर्वे रस्त्यावर मृत्युंजयेश्वर मंदिरासमोर २४x७ तास सेवेत उपलब्ध असणारे जनसंपर्क कार्यालय सुरु केले असल्याचे निमंत्रक मा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.