रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुणे शहर युवक आघाडी भारतरत्न विश्वभुषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त कोणत्याही प्रकारची फ्लेक्स न लावण्याचा निर्णय यावेळेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीने घेण्यात आला त्या पैशांचा उपयोग सामाजिक उपक्रम करण्यासाठी करण्याचा निर्णय हा युवक आघाडी यांच्या वतीने घेण्यात आला. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा श्री बाबर साहेब यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प विहार घालण्यात आला. त्यानंतर साहेबांच्या हस्ते तसेच विनायक हॉस्पिटल चे डॉ. तोरस्कर या दोघांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आली. जवळपास ४५ रक्तदात्यांनी जयंतीनिमित्त रक्तदान केले.

अधिक वाचा  “परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट”, सरसेनापती हंबीरराव’चा जबरदस्त टीझर रिलीज

सायंकाळी सामाजिक राजकीय तसेच आरोग्य विभागात कोविंड काळात जी मदत केली आणि सामाजिक कार्यास ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने संघर्ष योद्धा पुरस्कार देण्यात आला. यामध्ये वैद्यकीय विभागात डॉक्टर अरुणा तारडे मॅडम (क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय) त्याच प्रमाणे आरोग्य विभागात रविराज बेंद्रे, त्याचप्रमाणे राजकीय विभागांमध्ये मा सौ सायलीताई वांजळे शिंदे यांना देण्यात आला. त्याचप्रमाणे सुभाष भाऊ नाणेकर, बाबा धुमाळ, सचिन दांगट, संघर्ष युवा पुरस्कार हा भारत भूषण बराटे यांना देण्यात आला.

अधिक वाचा  राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, बृजभूषण सिंहांनी केले हे विधान..

त्याचप्रमाणे आपल्या भागातील पत्रकारांचा ही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सामाजिक राजकीय आणि मित्रपरिवार भरपूर संख्येने उपस्थित होते याचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर युवक आघाडी सरचिटणीस निलेश आगळे पुणे शहर संघटक अंकुश भाऊ सोनवणे यांनी करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद शिंदे यांनी केले.