पुणे | पुण्यातल्या खालकर मारुती चौकात राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज ठाकरे काल (15 एप्रिल) पुण्यात दाखल झाले आहेत.

मनसेने आयोजित केलेल्या या हनुमान चालिसा पठण कार्यक्रमासाठी अद्याप पोलिसांकडून मंडप आणि लाऊडस्पीकरसाठी परवानगी देण्यात आलेली नाही.6 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला अद्याप पोलिसांकडून परवानगी मिळाली नसल्याने कार्यक्रम होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं जाणार आहे.

अधिक वाचा  राज्यसभा नव्हे संपूर्ण महाराष्ट्रच! संभाजीराजेंचे नवे पोस्टर चर्चेत?

मनसेच्या या मोहिमेला राष्ट्रवादी काँग्रेसने अनोख्या पद्धतीने उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हनुमान जयंतीचा प्रसादाने मुस्लिमांचा रोजा सोडण्यात आला.

पुण्यातील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात शुक्रवारी (15 एप्रिल) संध्याकाळी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

दरम्यान, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशीद वरती भोंगे लावले तर समोर हनुमान चालीस लावा असे सांगितल्यानंतर अनेक ठिकाणी मनसे हनुमान चालीस लावले.

राज ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यानंतर मात्र पुण्यातील मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.