पुणे : गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोगें उतरवा नाही तर मशिदींपुढे स्पीकरवर हनुमान चालिसा लावा, असे आदेश मनसेच्या कार्यकर्त्यांना दिला. तर ठाण्यात झालेल्या सभेत ३ मे पर्यंत भोंग उतरविण्याचा सरकारला अल्टीमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या राज ठाकरे हनुमान जयंती साजरी करण्यासाठी पुण्यातील हानुमान मंदिरात येत आहेत. यावर काही दिवसांपूर्वी नाराज असलेले मनसेचे नगरसेवक वसंत मोरे या कार्यक्रमाला येणार का? या प्रश्नाला उत्तर देताना मोर म्हणाले, ‘राज ठाकरेंसोबत मी स्वतः जाणार आणि आरती करणार आहे’.

मोर म्हणाले, राज ठाकरे स्वतः जिथे आहेत. तिथे मला निमंत्रणाची गरज नाही. निमंत्रण आहे का नाही मी सांगणार नाही. पण राज ठाकरेंसोबत मी स्वतः जाणार आणि आरती करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

अधिक वाचा  अजितदादांनी वाढवलं शिवसेनेचं टेन्शन; संभाजीराजे यांनी अपक्ष अर्ज भरल्यास चुरस!

पुढे बोलताना ते म्हणाले, पुढील महिन्यात ३ मेला देशभरता ईद साजरी केली जाणार आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. भोंगे खाली न उतरवल्यास मशिदींसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या उद्याच्या कार्यक्रमाची माहिती मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी शिंदे यांना ‘वसंत मोरे हे उद्याचा कार्यक्रमाला येणार आहेत का?, असे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी ‘मी त्याचे उत्तर द्यायला बांधील नाही. ज्यांना कार्यक्रमाला यायचे ते येऊ शकतात मी फक्त कार्यक्रमाची माहिती देण्याकरिता तुमच्याशी संवाद साधत आहे. असे अजय शिंदे म्हणाले.

अधिक वाचा  “घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला”; सभेनंतर शिवसेना नेत्याची प्रतिक्रिया