हडपसर : काळेपडळ येथील सेलेना पार्क पाण्याच्या टाकीत येणाऱ्या पाण्याच्या लाईनचे काम आज पूर्ण झाले आहे. आज शनिवारी (दि.१६) या पाण्याच्या लाईनचे टेस्टिंग करण्यात येणार आहे.त्यांनतर कोणताही अडथळा न आल्यास सेलेना पार्क येथील पाण्याच्या टाकीतून परिसरात पाणी वितरित होणार आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे पाण्यासाठी होणारी वणवण आता थांबणार आहे.

सन २०१५ मध्ये काळेपडळ येथील सेलेना पार्क सोसायटीच्या अमेनेटीज स्पेसमध्ये महापालिकेच्या माध्यमातून सुमारे पंचवीस लाख लीटर क्षमतेच्या पाणी टाकीचे काम हाती घेण्यात आले होते. याशिवाय रामटेकडी ते सेलेना पार्क पाण्याच्या टाकी दरम्यान नवीन लाईनचे काम करण्यात सुरवात करण्यात आली होती.

अधिक वाचा  पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर तिप्पट

काळेपडळ येथील सेलेना पार्क येथे २५ लाख लीटर क्षमतेची पाण्याची टाकी तयार आहे. रामटेकडी ते सेलेना पार्क अशी सुमारे अडीच किलोमीटर अंतराची २०, २४,३६,४० इंच व्यासाची पाण्याची लाईन टाकण्यात आली आहे. पाण्याची लाईन टाकण्याचे काम आज पूर्ण झाले आहे. उद्या पाण्याच्या लाईनची टेस्टिंग करण्यात येणार आहे. टेस्टिंग यशस्वी झाल्यानंतर पाणी पुरवठा विभागाकडून नागरिकांना पाणी पुरवठा केला जाणार आहे.

दरम्यान, गेल्या सात वर्षांत पाण्याची टाकी आणि पाण्याच्या लाईनच्या कामांत अनेक अडचणी निर्माण झाल्या. पुरेशा निधी उपलब्ध करून देता आला नाही. काम करणाऱ्या ठेकेदाराने काम अर्धवट सोडून दिले. पाण्याच्या लाईनच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या यांना वेळ लागला. तर, काही ठिकाणी जागेचा मोबदला न दिल्याने पाण्याची लाईन अडवण्यात आल्या. असे विविध अडथळे दूर करून आज अखेर रामटेकडी पाण्याची टाकी ते सेलेना पार्क पाण्याची टाकी नवीन पाण्याच्या मुख्य लाईनचे काम पूर्ण झाले आहे.

अधिक वाचा  मविआनं ओबीसी आरक्षणाची हत्या केली; फडणवीसांचा हल्लाबोल

सेलेना पार्क पाण्याच्या टाकीतून या भागातील नागरिकांना खास करुन महिला भगिनींना पुरेसा पाणी पुरवठा व्हावा यासाठी सहाय्यक आयुक्त कार्यालय, महापालिका, लष्कर पाणी पुरवठा विभाग येथे वारंवार आंदोलने केली. राज्यसरकार स्तरावर मंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, नेते सचिन अहिर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून कामाला गती देण्याची विनंती केली. आवश्यक असणाऱ्या परवानग्या लवकरात लवकर मिळाव्यात यासाठीही प्रयत्न केले. आणि गेले अनेक दिवसांपासून रात्रंदिवस स्वतः थांबून या लाईनचे काम पूर्ण करून घेतले आहे.आता काळेपडळ,दुगड चाळ, हांडेवाडी रोड, चिंतामणी नगर,सय्यदनगर आणि परिसरातील महिला भगिनींना व नागरिकांना मुबलक व पुरेसे पाणी मिळणार यातच समाधान आहे.

अधिक वाचा  आता विधवांनाही सन्मान; 'हेरवाड ग्रामपंचायतीचा पॅटर्न' राज्यभर

आता रामटेकडी येथील पाण्याच्या टाकीतून पाणी उचलून ते सेलेना पार्क येथील पाण्याच्या टाकीमध्ये साठवण करण्यात येणार आहे. त्याची टेस्टिंग करण्यात येणार आहे. टेस्टिंग यशस्वी झाल्यानंतर नवीन लाईनचे वॉश आऊट करून लगेचच नागरिकांना पाणी पुरवठा केला जाणार आहे.