मुंबई : अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण हौसिंग सोसायटी त्याचप्रमाणे साईगणेश सेवा मंडळ या दोन संस्थांच्या विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२१ वा जयंती महोत्सव साईगणेश सेवा मंडळ अध्यक्ष अविनाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला, सदर कार्यक्रमात साईगणेश सेवा मंडळाचे उपाध्यक्ष विनोद साते, सरचिटणीस अनिकेत उकरंडे, कुणाल गायकवाड तसेच अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण हौसिंग सोसायटीचे चेअरमन विजय देवकुळे, सदस्य महेश खंदारे, संतोष सावंत, परशुराम गायकवाड, रायबा सकपाळ आदी मान्यवर व बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ५७८ चे अध्यक्ष श्रीधर मोरे, उपाध्यक्ष आनंद वाघमारे, सचिव अनंत मोहिते, सहसचिव काशिनाथजी पवार तसेच शाखेचे कार्यकर्ते रमाई महिला मंडळाच्या कार्यकर्त्या अश्या मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला, कार्यक्रमाप्रसंगी अनेक वक्त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त करून बाबासाहेबांना अभिवादन केले, त्याचबरोबर बौद्धजन पंचायत समिती, शिवडी गटक्रमांक १३ या विभागातून बहुमताने विजयी झालेले उमेदवार रामदास तथा राजाभाऊ धो. गमरे यांना जयंतीनिमित्त साईगणेश सेवा मंडळाचे अध्यक्ष अविनाश कांबळे यांच्या शुभहस्ते तसेच अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन विजय देवकुळे, शाखाध्यक्ष श्रीधर मोरे यांच्या उपस्थितीत शाल व पुष्पगुच्छ देऊन त्याना गौरविण्यात आले.

अधिक वाचा  ज्ञानवापीवर कंगना राणौत म्हणाली- 'काशीमध्ये कणा कणात महादेव'

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१ वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.