गुहागर – बौद्धजन सहकारी संघ शाखा क्रमांक २४ मौजे मुंढर तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या संस्थेच्या विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा १३१ वा जयंती महोत्सव एम. जी. गमरे यांच्या अध्यक्षतेखाली जेतवन बुद्ध विहार मुंढर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून संघटनेच्या अधिपत्याखाली असलेल्या विद्यार्थी विद्या विकास मंडळ यांच्या सौजन्याने जय भीम स्तंभाचा जीर्णोद्धार व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाला रमाई महिला मंडळ विद्यार्थी विद्या विकास मंडळ व शाखेचे सर्व आजी-माजी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्याचप्रमाणे मुंबईचे सचिव अनिल जाधव व कोषाध्यक्ष गुलशन पवार, सदस्य संजय पवार, शरद मोहिते, हे सुद्धा सहभागी होते, सदर प्रसंगी बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर तरुण पिढीने आपले विचार व्यक्त केले व मानवंदना दिली. गावचे पोलिस पाटील मा. निलेश गमरे, प्राध्यपक. उमेश जाधव, वंचित बहुजन आघाडी चे युवा कार्यकर्ते भूषण पवार, सुधीर गमरे, राजेश मोहित, सागर सुर्वे त्याच प्रमाणे विद्यार्थी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल सुर्वे, उपाध्यक्ष प्रशांत मोहिते, महासचिव तुषार पवार सचिव आशिष गमरे, खजिनदार सुयश गमरे आदींनी जय भीम स्तंभाच्या कामकाजात भरपूर परिश्रम घेतले. शाखेच्या वतीने काही मान्यवारांचा सत्कार करण्यात आला व शेवटी संस्थेचे सचिव अजित गमरे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमची सांगता केली.

अधिक वाचा  ‘रानबाजार’मधील बोल्ड सीन पाहून प्राजक्ता माळीच्या आईने दिली प्रतिक्रिया