मुंबई : किरीट सोमय्यांना बॉम्बे हायकोर्टाने विक्रांत घोटाळा प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांना हा दिलासा मिळाल्यानंतरच त्यांनी हे जाहीर केलं होतं की आज आणखी एक घोटाळा बाहेर काढणार त्याप्रमाणे आता त्यांनी नवा आरोप केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच त्यांनी काही प्रश्न विचारले आहेत. तसंच हवाला किंग नंदकिशोर त्रिवेदी यांना कुठे लपवलंय? असाही प्रश्न किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या?

हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला कुठे लपवलं आहे? त्याची माहिती जनतेला द्या अशी माझी विनंती आहे. नंदकिशोर त्रिवेदी हे उद्धव ठाकरे यांचे बिझनेस पार्टनर आहेत. त्यांच्या मदतीने उद्धव ठाकरेंनी मनी लाँड्रींग केलं आहे. नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहेत? हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं. आदित्य ठाकरे, तेसज ठाकरे, श्रीधर पाटणकर या सगळ्यांसोबत नंदकिशोर चतुर्वेदीचे अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचं बाहेर आलं आहे असाही आरोप आज किरीट सोमय्यांनी केला.

अधिक वाचा  ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालयाकडे वर्ग- सुप्रीम कोर्ट

मी जे तपास यंत्रणांच्या विविध अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ते शोधत आहेत कारण नंदकिशोर चतुर्वेदी गायब आहे. हवाला किंग एंट्री ऑपरेटर ठाकरे सरकारचे बिझनेस पार्टनर नंदकिशोर चतुर्वेदी यांना भगौडा तरी घोषित करा अशी आमची मागणी आहे. चतुर्वेदी यांनी कोट्यवधींचं मनी लाँड्रींग केलं आहे. सुमारे ३० कोटीचं मनी लाँड्रींग करण्यात आलं आहे.

सोमय्या यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची श्रीजी होम ही कंपनी आहे. यात मनी लॉड्रिंग करून पैसे आले आहेत. ही कंपनी पाटणकर यांची आहे. यात 29 कोटी काळा पैसा गुंतवला आहे. या कंपनीचा आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध काय हे उद्धव ठाकरे यांनी सांगितले पाहिजे, असं सोमय्या म्हणाले.

अधिक वाचा  टेक्सास गोळीबार प्रकरण; प्रियांका चोप्रा शोक व्यक्त करत म्हणाली...

सोमय्या यावेळी म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचे वाझे असलेल्या प्रवीण कलमे यांनी माझ्या विरोधात आरोप केले. ते प्रवीण कलमे कुठे आहेत, याची माहिती जितेंद्र आव्हाड देणार का? कलमे भारतात आहेत की विदेशात, असा सवाल त्यांनी केला. त्यांनी म्हटलं की, कलमे यांनी सरकारी फाईलमधून कागद चोरले आहेत. सरकार कारवाई का कारवाई करत नाही. कलमे यांना जितेंद्र आव्हाड यांनी मदत केली? अनिल परब यांनी मदत केली की उद्धव ठाकरे यांनी मदत केली? असाही सवाल त्यांनी केला. प्रवीण कलमे यांना फरार घोषित केलं जावं अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.