हडपसर : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त ई-श्रम कार्ड वाटप, आशा वर्कर सन्मान व समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सन्माननीय व्यक्तीचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष व स्मितसेवा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सौ स्मिताताई गायकवाड यांनी केले.
यावेळेस “स्मितसेवा समाजभूषण पुरस्कार” बच्चूसिंग टाक, पी.एस.आय. छायाताई कानपिळे व “स्मितसेवा समाजगौरव पुरस्कार” सुलभाताई साळुंके, संगीताताई बांगर, पुष्पाताई जाधव, शीलाताई साळुंखे, निरंजनाताई मुळे यांना देण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टी चे पुणे शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश पिंगळे, हडपसर विधानसभा अध्यक्ष संदिप दळवी, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, माजी नगरसेविका उज्वलताई जंगले, संघटन सरचिटणीस गणेश घुले, रविभाऊ तुपे, विजय परदेशी, प्रमोद सोरगावी, तुषार गायकवाड, देविदास बिनावडे, आकाश डांगमाळी, बाळासाहेब घुले, अभिजित भाऊ बोराटे, महेंद्रजी बनकर, गणेश भाऊ काळे, महेशजी ससाणे, राजूभाऊ महाडिक, विकासभाऊ गदादे, निखिलभाऊ शिंदे, महेशभाऊ टेळे पाटील, गुरुनाथ हडदरे, डॉ. अशोक सोरगावी, रविंद्रजी चव्हाण, सागर पवार, पानसरे सर, काशीनाथ भुजबळ, सतीश राठोड, वंदनाताई कोद्रे, सीमाताई शेंडे, सोनलताई कोद्रे, मंगलताई रायकर, मनीषाताई राऊत, संगीता पाटील, नूतन पासलकर, मोहिनी शिंदे, आरती कांबळे, विजया भुमकर, सुनंदा देशमुख, शोभा दांगट, मंगलाताई रायकर, विशाखा सुतार इतर भाजपा पदाधिकारी, स्मितसेवा फाउंडेशन सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिताताई गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन सुजाताताई गायकवाड यांनी केले व आभार प्रदर्शन रोहित कुलकर्णी यांनी केले.