हडपसर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सुरक्षा फाउंडेशन आणि भाजपा वतीने पुणे महानगरपालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कै. नर्मदाबाई किसन कांबळे प्राथमिक विद्यालय गोसावी वस्ती हडपसर याठिकाणी शैक्षणिक ॲप चे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. मुलांना ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण घेण्याची सद्यस्थितीत गरज निर्माण झाली आहे.ज्या बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा हा मंत्र देत समाजाला घडविण्याचे काम केले आहे, त्यांचा विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे काम हे शैक्षणिक ऍप करणार आहे. शिक्षणामुळेच बाबासाहेबांनी या देशाचे संविधान लिहिले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी न करता तो अनेक पिढ्या घडवणारा लोकोत्सव करण्यासाठी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले शैक्षणिक ॲप कार्य करणार आहे. सर्वश्रुत, सर्वसमावेशक आणि सर्वाना शिक्षण हीच खरी क्रांती आहे असे मत यावेळी सुरक्षा फाउंडेशन संस्थापक तथा भाजपा अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष इम्तियाजभाई मोमीन यांनी यावेळी सांगितले. हडपसर परिसरात विविध भागात इम्तियाजभाई मोमीन आणि सुरक्षा फाउंडेशन च्या पुढाकारातून हजारो विद्यार्थ्यांनी शैक्षणिक ॲपच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

अधिक वाचा  भारती सिंह कडून पहिली पोस्ट,माफी देखील मागितली, तरीही FIR दाखल, पाहा नेमकं प्रकरण काय?

भारतीय जनता पक्षाचे हडपसर अध्यक्ष दळवी,नगरसेविका हिमालीताई कांबळे, भाजपा संघटन सचिव गणेश घुले,आर पी आय नेते उद्धवजी चिलवंत, यादवजी हारणे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पारधे, भारत गायकवाड, सुधीर शिंदे आदी उपस्थित होते.

संदीप दळवी म्हणाले, ” गोर-गरीब आणि सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक ॲप शिक्षणातून बाबासाहेबांचा आशीर्वाद मिळणार आहे. नागरिकांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत परंतु सध्या स्पर्धेच्या जीवनामध्ये शिक्षण ही अतिशय महत्त्वाची गरज निर्माण झाली आहे. इम्तियाजभाई मोमीन यांनी ती बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुरण्याचा विधायक उपक्रम राबवत अनोखा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

अधिक वाचा  बॉबी देओलच्या संपूर्ण करिअर ची वाट लाऊन टाकली होती या अभिनेत्रीने,नाव जाणून तुम्ही अवाक् व्हाल

नगरसेविका हेमाली कांबळे म्हणाले, “कोरोनानंतर प्रथमच जयंती उत्साहात होत असल्याने वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी होत असताना समाजाला अभिमान वाटेल आणि आदर्श करणारा उपक्रम आहे.

यावेळी कै.नर्मदाबाई किसन कांबळे प्राथमिक विद्यालय मधील सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद आणि पालकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.