मुंबई : मशिदींवरील भोंग्यांच्या वादाने मनसेचे राज ठाकरे यांनी शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून खूप मागे टाकले आहे. यावरून शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि मंत्री आदित्य ठाकरे  यांनी राज ठाकरेंना उत्तर देण्याचा प्रयत्न केला “भोंग्यातून वाढलेल्या किमतींबद्दलही लोकांना सांगता आले तर हेही सांगावे की पेट्रोल-डिझेलची, सीएनजीची दरवाढ कशामुळे झाली? आणि ६० वर्षांपूर्वी न जाता गेल्या २-३ वर्षांत काय झालं हे सांगावे.”

या टीकेला उत्तर देताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी घोटाळ्यांच्या आरोपावरून कोंडीत सापडलेल्या शिवसेनेला टोमणा मारला. आदित्य ठाकरे याना डिवचले. संदीप देशपांडे यांनी ट्विट केले “महागाईवर आम्हीच बोलायचे, पेट्रोल दरवाढीवर पण आम्हीच बोलायचे, कोरोना काळात जेव्हा तुम्ही लपून बसला होता तेंव्हा लोकांच्या समस्या पण राज ठाकरेंनीच सोडवायच्या. आणि तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार आणि टेंडर मधले कमिशन खाणार?”

अधिक वाचा  पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर तिप्पट

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, शिवसेनेतील अनेक नेत्यांसह स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे.