भंडारा : भंडारा गोंदिया जिल्ह्यातील धान घोटाळ्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यकर्तेच सामील असल्याचा गैाप्यस्फोट भाजप खासदार सुनील मेंढे यांनी केला आहे, ते माध्यमांशी बोलत होते.

याप्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशी करावी, अशी मागणी मेंढे यांनी केली होती. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यात धान घोटाळा उघड होणार असल्याचे मेंढे यांनी सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यकर्ते स्वतः या धान घोटाळ्यात सामील असल्याने चौकशी दाबण्याचा प्रकार त्यांच्याकडून पर्यायाने महाविकास आघाडी सरकारकडून होत असल्याच्या आरोप खासदार सुनील मेंढे यांनी केला आहे. ‘

अधिक वाचा  "मला संघाने कुलगुरू केले, राज्याने नव्हे"-डॉ. शांतिश्री पंडित

‘केंद्र सरकारने भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील एकोणवीस राईस मिलर्स ला दोषी मानत त्यांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश दिले असताना महाविकास आघाडी सरकार स्वत: मिल मालकांना वाचविण्याच्या आरोप मेंढे यांनी केला आहे.

”एकीकडे नाना पटोले स्वतःला शेतकरी नेते भूमिपुत्र म्हणून घेतात आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचे अहित करतात,” असा खोचक टोला खासदार सुनील मेंढे यांनी लगावला. त्यामुळे येत्या काही काळात धान घोटाळ्याची सीबीआयद्वारे चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

2019 मध्ये खरीप आणि रब्बी हंगामात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने करण्यात आलेल्या धान खरेदीत मोठा गैरव्यवहार झाला आहे.

अधिक वाचा  अभिनेता पुष्कर जोग यांच्या आईवर पुण्यात गुन्हा दाखल, शिक्षण क्षेत्रात खळबळ

मोठ्या प्रमाणात बनावट सातबारा नमुना आठ जोडून शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांकडून शासकीय धान खरेदी करून आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला होता. याची तक्रार वारंवार करून सुद्धा कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने खासदार मेंढे यांनी अधिवेशनात भंडारा गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदी घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती.

आता ही मागणी मान्य झाली असून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता सीबीआयकडून भंडारा गोंदिया जिल्ह्यातील धान घोटाळ्याची माहिती मागवणे सुरू झाले असून चक्क सीबीआय चौकशी करणार असल्यामुळे आता धान खरेदी केंद्र संचालकाचे धाबे दणाणले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असताना त्यांनी एसआयटी मार्फत घोटाळ्याचे चौकशीचे आदेश दिले होते. या चैाकशीत पटोले यांच्या कार्यकर्त्यांचे नाव आल्याने हे प्रकरण पटोले यांच्याकडून दाबण्यात आले, असा आरोप मेंढे यांनी केला आहे.