मुळशी: शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) महाराष्ट्र, पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,पुणे द्वारा व पंचायत समिती मुळशी आयोजित स्टार्स प्रकल्प अंतर्गत इयत्ता पहिलीला दाखलपात्र विद्यार्थ्यांचा ‘शाळापूर्व तयारी मेळावा’ जि.प.प.प्राथ.शाळा पडळघरवाडी येथे संपन्न झाला. पहिलीला दाखल पात्र विद्यार्थ्यांना शाळेची व शैक्षणिक वातावरणाची आवड निर्माण व्हावी, त्यांची शाळेविषयीची भीती दूर व्हावी व त्यांना हसत खेळत व आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
रिहे गावच्या प्रभारी सरपंच सौ.सुरेखाताई प्रवीण पडळघरे चौधरी,पडळघरवाडीच्या मुख्याध्यापिका श्रीम प्रीतम शेलार सहशिक्षिका श्रीम मनीषा पाटोळे, ग्रामपंचायत सदस्या सौ.दिपाली मेहुल- पडळघरे, सौ. शा.व्य.समिती अध्यक्षा सौ.मयुरताई राहुल पडळघरे, सदस्या सौ.ज्योतीताई शिंदे, मोहिनी शिंदे, निकिता बोडके, शीतल बोडके, अंगणवाडी कार्यकर्त्या शंकूतलाताई पडळघरे, रोहिणीताई जाधव, गजानन पडळघरे, केशव पडळघरे उपस्थित होते.
कोरोना महामारीमुळे जवळपास दोन वर्ष विद्यार्थी शाळेपासून लांब होते. नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता १ ली ला दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा ‘शाळापुर्व तयारी मेळावा’ अत्यंत महत्त्वाचा आहे. शाळेत दाखल होणाऱ्या या बालकांना शाळेविषयी व शिक्षणाविषयी गोडी लागावी, त्याचे शिक्षण आनंददायी व्हावे यासाठी अतिशय उत्साहात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षिका मनीषा पाटोळे यांनी दिली.
या मेळाव्यात बालकांचा शारीरिक विकास,बौद्धिक विकास, भावनात्मक व सामाजिक विकास, गणन क्रियेचा विकास, अतिरिक्त पूरक मार्गदर्शन इत्यादी घटकांचा व त्याच्या परिचयातील विविध वस्तूंचा वापर सहजरित्या तो करतो का ? याबाबतचा आढावा व पडताळणी घेण्यात आली. अतिशय दर्जेदार व आकर्षक शाळा सजावट, विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आकर्षक व आवडीचे शैक्षणिक साहित्य,बोलका शालेय परिसर या मेळाव्याचे खास आकर्षण होते दखलपात्र मुलाची ट्रॅक्टर मध्ये बसून ‘डोल ताशे व लेझीम यांच्या गजरात काढलेली शोभा यात्रा यासाठी श्री नितिन बोडके यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला. मुलांना खाऊ व भेटवस्तु मेहुल पडळघरे व प्रवीण पडळघरे यांनी दिला.एकूणच हा ‘शाळापूर्व तयारी मेळावा’ उत्साहात पार पडला.