मुंबई: टीम इंडिया आणि चेन्नईचा जान मान आणि शान असलेला स्टार खेळाडू गेल्या काही दिवसांपासून मैदानाबाहेर आहे. दुखापतीमुळे तो खेळू शकत नाही. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात तो सहभागी नसेल मात्र ठरावीक सामने तो खेळू शकेल अशी अशा होती ती देखील आता मावळी आहे.

दीपक चाहर दुखापतीमधून अजून पूर्ण बरा झाला नाही. त्यामुळे तो आयपीएलमध्येही खेळणार नाही. त्यासोबतच आता टीम इंडियासाठी धक्कादायक बातमी आहे. दीपक चाहर 4 महिने मैदानापासून दूर राहू शकतो. त्यामुळे आयपीएल पाठोपाठ आता टी 20 वर्ल्ड कपमधूनही तो बाहेर जाण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  राज ठाकरेंची अशी तयारी... धमकीला मनसेची केराची टोपली

टी 20 वर्ल्ड कपचे सामने 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. टीम इंडिया 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणार आहे. या सामन्यापर्यंत दीपक चाहर पूर्ण फिट व्हाव अशी प्रार्थना टीम इंडियाचे खेळाडू आणि चाहते करत आहेत.

चेन्नई टीमने दीपक चाहरला 14 कोटी देऊन आपल्या टीममध्ये घेतलं. मात्र त्याला दुखापत झाल्याने तो एकही आयपीएलमधील सामना खेळू शकला नाही. त्यामुळे चेन्नईच्या टीमचं समीकरण बिघडलं आहे. 5 पैकी एक सामना जिंकण्यात चेन्नईला यश मिळालं आहे.